कार्य हीच ओळख

जनहितार्थ आमच्या २४ तास मोफत उपलब्ध असलेल्या सेवा

0

एकूण पूर्ण झालेली विकासकामे

३० जुलै २०२६

51. स्वराज गार्डन रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण

📍 स्वराज गार्डन रोड, पिंपळे सौदागर 🗓 ३० जुलै २०२६ भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्वराज गार्डन रोडवरील खड्डे भरून रस्ता अधिक सुरक्षित व सुकर करण्यात आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा निर्माण करणाऱ्या या समस्येची तातडीने दखल घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही कार्यवाही करण्यात आली आहे.

२२ जुलै २०२६

50. पेव्हर ब्लॉक दुरुस्तीचे काम

📍 गोविंद गार्डन हॉटेल चौक, पिंपळे सौदागर 🗓 २२ जुलै २०२६ पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन हॉटेल चौकातील पेव्हर ब्लॉक दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर असून, परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कामाला गती देण्यात आली आहे. या विकासकामासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला लाभला.

२१ जुलै २०२६

49. दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करून घेण्यात आली

📍 जी.के. गुरुकुल शाळेसमोर, पिंपळे सौदागर 🗓 २१ जुलै २०२६ भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या निदर्शनास जी.के. गुरुकुल शाळेसमोरील रस्त्यावर ड्रेनेज चेंबरचे झाकण रस्त्याच्या पातळीपेक्षा धोकादायकरीत्या वर आले असल्याची बाब आली होती. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या बाबीची तात्काळ दखल घेत संबंधित महानगरपालिका विभागाशी समन्वय साधून आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करून घेण्यात आली. त्यामुळे रस्ता पुन्हा सुरक्षित करण्यात आला असून वाहनचालक व नागरिकांचा संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.

१३ जुलै २०२६

48. SIR विशेष नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

📍 रोझ आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर 🗓 १३ जुलै २०२६ भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली रोझ आयकॉन सोसायटी येथे आयोजित SIR (Special Intensive Revision) विशेष नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये मतदार यादीतील माहितीची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती, नव्या मतदारांची नोंदणी तसेच SIR प्रक्रियेबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली मतदार नोंद अद्ययावत करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक मतदार नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. याच उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.!

०७ जुलै २०२६

47. चेंबर कव्हर बदलून अपघाताचा धोका टाळला

📍 गोविंद गार्डन रोड, पिंपळे सौदागर 🗓 ०७ जुलै २०२६ धोकादायक आरसीसी चेंबर कव्हर बदलून अपघाताचा धोका टाळला! भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंद गार्डन रोड परिसरातील धोकादायक स्थितीत असलेले आरसीसी चेंबर कव्हर तातडीने बदलण्याचे काम पूर्ण करण्यात आले. सदर चेंबर कव्हर खराब व खचलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित विभागामार्फत त्वरित कार्यवाही करून नवीन व सुरक्षित आरसीसी चेंबर कव्हर बसविण्यात आले. त्यामुळे परिसरातील वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

०७ जुलै २०२६

46. पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीची कार्यवाही

📍विश्वशांती कॉलनी क्र. ४, पिंपळे सौदागर 🗓 ०७ जुलै २०२६ पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीची कार्यवाही; चेंबर स्वच्छतेमुळे नागरिकांना दिलासा! भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पुढाकारातून विश्वशांती कॉलनी क्र. ४ परिसरात पावसामुळे चेंबर तुंबल्याने साचलेल्या पाण्याची समस्या तातडीने हाताळण्यात आली. संबंधित विभागाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व चेंबर्सची स्वच्छता करून अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत झाला असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे यांनीही कामाची पाहणी करून नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर तत्परतेने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली.

०७ जुलै २०२६

45. आरसीसी चेंबर कव्हर बदलण्याचे काम पूर्ण

📍मिथिला नगरी सोसायटी रोड, पिंपळे सौदागर 🗓 ०७ जुलै २०२६ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य… आरसीसी चेंबर कव्हर बदलण्याचे काम पूर्ण! भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिथिला नगरी सोसायटी रोड परिसरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या आरसीसी चेंबर कव्हरचे बदलण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात अधिक सुरक्षितता निर्माण झाली असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे. स्थानिक नागरिकांनी या तातडीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

४ जुलै २०२६

44. झाड कोसळून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

📍प्रभात हाइट्स, पिंपळे सौदागर गावठाण 🗓 ४ जुलै २०२६ वादळी पावसामुळे प्रभात हाइट्स परिसरात मोठे झाड कोसळून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ महापालिकेच्या संबंधित विभागाशी समन्वय साधण्यात आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून झाड सुरक्षितपणे कापून हटविण्याची कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांना संभाव्य धोका टळला.

४ जुलै २०२६

43. झाड कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी

📍कुणाल आयकॉन रोड, सौदागर हॉटेल परिसर, पिंपळे सौदागर 🗓 ४ जुलै २०२६ भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. कुणाल आयकॉन रोडवरील सौदागर हॉटेल परिसरात झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे यांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. कोसळलेले झाड त्वरित हटवून वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना देत आवश्यक ती कार्यवाही करून घेण्यात आली. यापूर्वी पिंपळे सौदागर परिसरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत संपूर्ण परिसराचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या धोकादायक स्थितीत आढळतील, त्या ठिकाणी तातडीने योग्य ती कार्यवाही करून आवश्यक फांद्या छाटण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.

३ जुलै २०२६

42. सुमारे २५ वर्षे जुने वडाचे झाड

📍तुषार रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर 🗓 ३ जुलै २०२६ तुषार रेसिडेन्सी परिसरात सुमारे २५ वर्षे जुने वडाचे झाड कोसळल्याची माहिती प्राप्त होताच भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री. शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला त्वरित कळविण्यात आले. त्यानंतर झाड हटविणे, परिसर सुरक्षित करणे तसेच बचाव व मदतकार्य सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्यात आला.

१५ जून २०२६

41. NCMC कार्ड वितरण उपक्रम

📍उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर 🗓 ️१५ जून २०२६ डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या पुढाकारातून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या NCMC कार्ड वितरण उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल ९५६ नागरिकांना NCMC कार्डांचे वितरण करण्यात आले. "वन नेशन, वन कार्ड" या संकल्पनेवर आधारित NCMC कार्डमुळे मेट्रो, बस, पार्किंग, टोल तसेच विविध डिजिटल व्यवहार एकाच कार्डद्वारे सुलभपणे करता येणार आहेत. नागरिकांना आधुनिक व कॅशलेस व्यवहार प्रणालीशी जोडण्याचा हा उपक्रम ठरला. यावेळी ह.भ.प. विजयशेठ जगताप, जयनाथ काटे, भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिताताई काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे

२६ मे २०२६

40. योगा पार्क’च्या कामांचा आढावा

📍पिंपळे सौदागर 🗓️ २६ मे २०२६ नागरिकांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीला चालना देणाऱ्या आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नूतन ‘योगा पार्क’च्या कामांचा आढावा घेण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. योगा पार्क नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी प्रलंबित कामांबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यामध्ये उद्यानाची देखभाल, लॉन दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था तसेच क्रीडा विभागाच्या उर्वरित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. परिसरातील नागरिकांना सकस आरोग्य, व्यायाम आणि विरंगुळ्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य असून, हे उद्यान लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू

२२ मे २०२६

39. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

📍जी.के. गुरुकुल शाळा मार्ग, पिंपळे सौदागर 🗓️ २२ मे २०२६ जी.के. गुरुकुल शाळेसमोरील मुख्य रस्त्यावरील पेव्हिंग ब्लॉक मोठ्या प्रमाणावर खचल्याने व जागोजागी उखडल्याने या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. विशेषतः शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, सहयोगी नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे तसेच उद्योजक श्री. संजय भिसे यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या समस्या जाणून घेत संबंधित प्रशासनाला तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या रस्त्यावरील खराब झालेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे दुचाकी घसरणे, वाहतूक मंदावणे आणि परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण रस्ता समपातळीत करून दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२६ जून २०२६

38. तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली

📍श्रीमान योगी सोसायटी बाहेर, शिवराज नगर, कोकणे चौक ते औंध–रावेत बीआरटीएस मार्ग 🗓️ २६ जून २०२६ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागामार्फत तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली. श्रीमान योगी सोसायटी बाहेर, शिवराज नगर, कोकणे चौक ते औंध–रावेत बीआरटीएस मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. या कामामुळे वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर झाला आहे.

२५ जून २०२६

37. दर्जेदार काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण

📍श्री स्वामी समर्थ कॉलनी, पिंपळे सौदागर 🗓️ २५ जून २०२६ श्री स्वामी समर्थ कॉलनीत दर्जेदार काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण; नागरिकांना दिलासा.! स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत श्री स्वामी समर्थ कॉलनी येथे नव्याने काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या विकासकामामुळे परिसरातील वाहतुकीची सुविधा अधिक सुरक्षित, सुकर आणि टिकाऊ झाली असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्यातून हे विकासकाम पूर्णत्वास आले.

१७ जून २०२६

36. टेनिस कोर्टचे नूतनीकरण

📍बाळासाहेब कुंजीर मैदान, पिंपळे सौदागर 🗓️ १७ जून २०२६ क्रीडा सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी बाळासाहेब कुंजीर मैदान येथील टेनिस कोर्टचे नूतनीकरण करत आकर्षक पेंटिंगचे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंना अधिक चांगल्या आणि दर्जेदार वातावरणात सराव करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनातून परिसरातील क्रीडा सुविधांच्या उन्नतीसाठी सातत्याने विविध विकासकामे राबविली जात आहेत. युवक-युवतींना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच परिसरात आधुनिक आणि सुसज्ज क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे काम करण्यात आले असून स्थानिक खेळाडूंनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

१५ जून २०२६

35. नागरिकांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासाला प्राधान्य

📍पिके चौक 🗓️ १५ जून २०२६ पावसाळ्याच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासाला प्राधान्य देत पिके चौक परिसरातील दगडी गट्टू (पेव्हर ब्लॉक) रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे महानगरपालिकेमार्फत काँक्रीटच्या साहाय्याने तातडीने दुरुस्त करण्यात आले. या कामामुळे रस्त्याची गुणवत्ता सुधारली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच नगरसेविका मा. सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

११ जून २०२६

34. वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत तातडीने दखल

📍भिसे पार्क, पिंपळे सौदागर 🗓️ ११ जून २०२६ भिसे पार्क परिसरात सातत्याने उद्भवत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पुढाकाराने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केली. परिसरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या विजेच्या व्यत्ययामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, समस्येची कारणमीमांसा करून तिच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी आवश्यक तांत्रिक कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून कामाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात आला.

०९ जून २०२६

33. फूटपाथ दुरुस्तीची कामे पूर्ण

📍पिंपळे सौदागर 🗓️ ०९ जून २०२६ पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी फूटपाथ दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्यातून चूल मटण रोड, वन नेशन रोड, शिवसाई लेन तसेच परिसरातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरील खराब झालेल्या फूटपाथची दुरुस्ती करण्यात आली आहे. या कामामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य पादचाऱ्यांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्करपणे प्रवास करता येणार असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

०५ जून २०२६

32. मूलभूत सुविधांना बळकटी

📍विश्वशांती कॉलनी क्र. ४ 🗓️ दि. ०५ जून २०२६ भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्याने विश्वशांती कॉलनी क्र. ४ परिसरात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक सक्षम, सुरळीत आणि स्वच्छ सांडपाणी व्यवस्थेचा लाभ मिळावा या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरी गरजा लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

०२ जून २०२६

31. नादुरुस्त व खराब झालेल्या पेव्हर ब्लॉक्सची दुरुस्ती

📍जीवन ज्योती हॉस्पिटल समोर, पिंपळे सौदागर 🗓️ ०२ जून २०२६ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवन ज्योती हॉस्पिटल समोरील नादुरुस्त व खराब झालेल्या पेव्हर ब्लॉक्सची दुरुस्ती करून नवीन पेव्हर ब्लॉक्स बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरी सुविधांच्या देखभाल व सुधारणा कामांना सातत्याने गती मिळत आहे.

०१ जून २०२६

30. मूलभूत नागरी समस्यांच्या निराकरणासाठी ठोस पावले

📍पिंपळे सौदागर, प्रभाग क्र. २८ 🗓️ दि. ०१ जून २०२६ नागरिकांच्या दैनंदिन सुविधांना प्राधान्य देत परिसरातील मूलभूत नागरी समस्यांच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर येथील PCMC हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्यावर खराब झालेल्या चेंबरची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. याचबरोबर पिंपळे सौदागर गावठाण परिसरातील ड्रेनेज लाईनमध्ये निर्माण झालेल्या चोकअपच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व ड्रेनेज लाईन्सची स्वच्छता व चोकअप काढण्याच्या कामास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. परिसरातील स्वच्छता, सुरळीत सांडपाणी व्यवस्थापन आणि नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणासाठी आवश्यक असलेल्या या कामांमुळे अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्यांना दिलासा मिळणार आहे.

२९ मे २०२६

29. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल

📍मुंजोबा मंदिर चौक 🗓️ २९ मे २०२६ स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंजोबा मंदिर चौक परिसरातील चोकअप झालेल्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता करून अडथळा दूर करण्यात आला. ड्रेनेज लाईनमधील अडथळ्यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. संबंधित विभागाशी समन्वय साधून तातडीने यंत्रणेला कामास लावण्यात आले व चोकअप काढून ड्रेनेज व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

२८ मे २०२६

28. परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी आकर्षक

📍पी.के. चौक, पिंपळे सौदागर 🗓️ २८ मे २०२६ विश्वशांती प्रतिष्ठान गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या लिनिअर गार्डनमधील मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी आकर्षक बनावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांना विरंगुळ्यासाठी उत्तम सार्वजनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या प्रयत्नांतून हे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागत आहे.

२७ मे २०२६

27. मूलभूत प्रश्नांवर तातडीने कार्यवाही

📍प्रभाग क्र. २८, रहाटणी – पिंपळे सौदागर 🗓️ २७ मे २०२६ नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देत परिसरातील मूलभूत प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. सौ. अनिताताई संदीप काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील बीआरटी बस स्थानकांच्या अस्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने उचलून धरला. परिसरातील विविध बीआरटी बस स्थानकांवर वाढलेली अस्वच्छता, धूळ व कचऱ्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यानंतर PMPML प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत बीआरटी बस स्थानकांच्या साफसफाईचे काम हाती घेतले असून सध्या स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीत सुविधा मिळाव्यात यासाठी विकासकामांसोबतच दैनंदिन नागरी प्रश्नांवर देखील सातत्याने लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

२३ मे २०२६

26. नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य

📍मारुती भिसे कॉलनी , पिंपळे सौदागर गावठाण 🗓️ २३ मे २०२६ नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत पिंपळे सौदागर गावठाण येथील मारुती भिसे कॉलनी समोरील इमारतीलगत असलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून ड्रेनेजच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत होता. सदर समस्या लक्षात घेऊन तातडीने पाठपुरावा करत काम पूर्ण करण्यात आले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे तसेच नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास आले.

२२ मे २०२६

25. कुणाल आयकॉन रोडचा कायापालट

📍कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर 🗓️ २२ मे २०२६ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान व्हावी या उद्देशाने कुणाल आयकॉन रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि सहयोगी नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांनी उपस्थित राहून कामाच्या दर्जाचा आढावा घेतला. कामाची गुणवत्ता, वेळेचे योग्य नियोजन तसेच नागरिकांना कामादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. प्रकल्प विभागामार्फत सुरू असलेले हे काम नियोजनबद्ध पद्धतीने, दर्जेदार साहित्याचा वापर करून आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सुरक्षित वाहतूक, उत्तम पायाभूत सुविधा आणि नागरिकांचे समाधान हीच आमची प्राथमिकता आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

२२ मे २०२६

24. अनेक दिवसांपासून प्रलंबित मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप

📍श्री स्वामी समर्थ कॉलनी 🗓️ २२ मे २०२६ श्री स्वामी समर्थ कॉलनी येथील नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळत आहे. परिसरामध्ये काँक्रिट रस्ता तसेच स्टॉर्म वॉटर पाईपलाईन या महत्त्वपूर्ण विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांना चांगले रस्ते तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि सहयोगी नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या पुढाकारातून व विशेष प्रयत्नांतून हे विकासकाम मार्गी लावण्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणे हेच आमचे ध्येय असून, पुढील काळातही विकासकामांचा हा वेग कायम ठेवणार आहोत.

१६ मे २०२६

23. पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

📍जरवरी रोड | पिके स्कूल समोर 🗓️ १६ मे २०२६ महानगरपालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी उकरण्यात आलेल्या फूटपाथवरील पेव्हर ब्लॉकचे काम अखेर पुन्हा सुरू करण्यात आले असून सध्या पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम रखडल्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिसरातील नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई संजय भिसे , नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या विशेष पाठपुरावा व प्रयत्नांतून हे महत्त्वाचे काम मार्गी लागले.

१६ मे २०२६

22. ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण

📍पिंपळे सौदागर 🗓️ १६ मे २०२६ घरोंदा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार निर्माण होणाऱ्या चोकअपच्या गंभीर समस्येमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या अडचणीची तात्काळ दखल घेत संबंधित ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई संजय भिसे , नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या विशेष पाठपुरावा व प्रयत्नांतून हे महत्त्वाचे काम मार्गी लागले. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

२७ मार्च २०२६

21. परिसरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था तसेच स्वच्छतेसंबंधित

📍सम्राट नगर, केशव नगर 🗓️ २७ मार्च २०२६ सम्राट नगर, केशव नगर परिसराला भेट देत श्री. संजय भिसे यांच्या समवेत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी परिसरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था तसेच स्वच्छतेसंबंधित विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेत तत्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना स्थळी बोलावून आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी भाजपाच्या अध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री. शत्रुघ्न (बापू) काटे सहयोगी नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या साथीने मी सैदव कटिबद्ध आहे.

२२ मार्च २०२६

20. अनधिकृत पार्किंग संदर्भात तक्रारीची तात्काळ दखल

📍पारस रिवर सोसायटी परिसर, पिंपळे सौदागर 🗓️ २२ मार्च २०२६ पारस रिवर सोसायटी परिसरात अनधिकृत (Illegal) पार्किंग संदर्भात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. नगरसेविका डॉ.सौ. कुंदाताई भिसे यांचे प्रतिनिधित्व करत श्री. संजय भिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची पाहणी केली व योग्य ती कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

२० मार्च २०२६

19. ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ १८ मी. रस्ता काम सुरू

📍पिंपळे सौदागर 🛣️ ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ १८ मी. रस्ता काम सुरू 🗓️ २० मार्च २०२६ पिंपळे सौदागरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा पार करत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ येथील १८ मीटर रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे व नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सर्व अडथळे दूर होऊन हा प्रकल्प मार्गी लागला. या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी व धुळीच्या त्रासातून नागरिकांना दिलासा मिळणार असून, पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागासाठी ही एक महत्त्वाची जीवनरेखा ठरणार आहे.

१७ मार्च २०१६

18. डॉग पार्कमध्ये पाणी व विद्युत विभाग संदर्भात पाहणी

📍पिंपळे सैदागर, डॉग पार्क 🗓️ दि. १७ मार्च २०१६ पिंपळे सैदागर येथील डॉग पार्कमध्ये पाणी व विद्युत विभाग संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची सविस्तर माहिती घेण्यात आली व त्या तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत मिळाव्यात यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. या विषयावर नगरसेवक तथा शहराध्यक्ष भाजपा मा. श्री. शत्रुघ्न बापू काटे व नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

१४ मार्च २०२६

17. रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

📍शिवराज नगर, राहटणी 🗓️ १४ मार्च २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी शिवराज नगर, राहटणी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. तसेच परिसरातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या मंदिराच्या जागेचीही पाहणी केली. मंदिर परिसरात लवकरच पेव्हर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी परिसरातील मुलांसाठी असलेल्या कबड्डी मैदानासाठी लाल माती उपलब्ध करून देणे तसेच त्या ठिकाणी सोलर लाईट बसविण्याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल याबाबत नागरिकांना आश्वस्त केले. भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे आणि नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या साथीने परिसरातील विकासकामे अधिक वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला.

६ मार्च २०२६

16. पोलिस स्टेशन अर्ज

📍पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन 🗓️ ६ मार्च २०२६ पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आयुक्तांना निवेदन पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे येथे नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली महानगरपालिकेची जागा उपलब्ध करून देणे तसेच भाडेकरार प्रक्रिया पूर्ण करणे, स्वच्छतागृहाची व्यवस्था, शटर बसविणे, खिडक्यांची दुरुस्ती आणि रंगकाम आदी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन मागणी केली. पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना लवकरात लवकर पोस्ट ऑफिसची सुविधा मिळावी यासाठी प्रभागातील नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे आणि नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने हा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना टपाल, बचत योजना, पार्सल सेवा तसेच विविध शासकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.

२७ मार्च २०२६

15. पोस्ट ऑफिस अर्ज

पिंपळे सौदागरमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी ठोस पाठपुरावा.! 🗓️ २७ मार्च २०२६ पिंपळे सौदागर परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मा.विनोय चौबे साहेबांची भेट घेऊन स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले. सध्या परिसरातील नागरिकांना विविध पोलीस कामांसाठी सांगवी पोलीस स्टेशन येथे जावे लागते. अंतर, वेळ आणि वाढती गर्दी यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिंपळे सौदागरमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू होणे ही काळाची गरज आहे. या प्रश्नावर भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री. शत्रुघ्न (बापू) काटे तसेच सहयोगी नगरसेविका मा.अनिताताई संदीप काटे यांच्या साथीने पाठपुरावा करीत असून , या संदर्भात आयुक्त महोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शवून यावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

०९ मार्च २०२६

14. ड्रेनेज समस्या मार्गी

📍 विश्वशांती कॉलनी क्र. ५ 🗓️ ०९ मार्च २०२६ विश्वशांती कॉलनी क्र. ५ परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून ड्रेनेज लाईनचे चोकअप काढून घेण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला. परिसरातील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. कुंदाताई संजय भिसे या सदैव कटिबद्ध असून, सहयोगी नगरसेवक तथा भाजपाचे शहराध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे आणि सहयोगी नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहोत.

०४ मार्च २०२६

13. शाळेसमोर गतीरोधक

पिंपळे सौदागर येथे विविध गतिरोधक बसविण्याच्या सूचना 🗓️ ०४ मार्च २०२६ पिंपळे सौदागर येथील जरवरी रोडवरील पिके इंटरनॅशनल स्कूल समोर (१) तसेच , यश संकुल रोड येथे (३) विद्यार्थ्यांची व नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेता रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एकूण ४ गतिरोधक (Speed Breaker) बसविण्याबाबत नगरसेविका डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष माननीय श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागणार সম্ব.

२५ फेब्रुवारी २०२६

12. फुटपाथ पेव्हर ब्लॉक दुरुस्ती

📍 काटे वस्ती रोड परिसर 25 फेब्रुवारी 2026 स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या काटे वस्ती रोड परिसरातील फुटपाथवरील काही पेव्हर ब्लॉक खराब झाल्याची नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान फुटपाथवरील उखडलेले व तुटलेले पेव्हर ब्लॉक तात्काळ दुरुस्त करण्याबाबत संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी काम त्वरित व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे तसेच नगरसेविका सौ. अनिताताई काटे यांनीही या कामाबाबत लक्ष घालून प्रशासनाशी समन्वय साधला आहे. नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत परिसरातील सुविधांची नियमित पाहणी व आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत.

२५ फेब्रुवारी २०२६

11. रस्ता डांबरीकरणास प्रारंभ

📍 लोंढे कॉर्नर, पिंपळे सौदागर येथे डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ ; नागरिकांना मोठा दिलासा पिंपळे सौदागर येथील लोंढे कॉर्नर परिसरात रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका सौ. अनिताताई काटे तसेच नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम प्रत्यक्षात मार्गी लागले आहे. गेल्या काही काळापासून या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेला डांबर आणि पावसाळ्यात साचणारा चिखल यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक ठरत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळवून दिली. सद्यस्थितीत सुरू झालेल्या या कामामुळे परिसरातील रस्ते अधिक मजबूत, सपाट आणि सुरक्षित होणार असून नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्डे व चिखलाच्या समस्येतूनही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या विकासकामाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले आहेत. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देत अशा विकासकामांना भविष्यातही गती दिली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

२३ फेब्रुवारी २०२६

10. प्रलंबित रस्त्याच्या कामाला गती

📌 विश्वशांती कॉलनी क्रमांक ०६ येथील गेल्या ०३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला गती 🗓️ २३ फेब्रुवारी २०२६ विश्वशांती कॉलनी क्रमांक ०६ येथील गेल्या ०३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून हे काम आता मार्गी लागत आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करून परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. या कामासाठी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष मा.श्री. शत्रुघ्न (बापू) काटे , नगरसेविका मा. अनिताताई संदीप काटे , नगरसेविका डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, भविष्यातही विकासकामांना प्राधान्य देत जनतेच्या विश्वासास पात्र राहण्याचा संकल्प व्यक्त करीत आहोत.

१६ फेब्रुवारी २०२६

9. पाणीपुरवठा समस्येवर बैठक

📍कुंदन इस्टेट सोसायटी , पिंपळे सौदागर 🗓️ १६ फेब्रुवारी २०२६ कुंदन इस्टेट सोसायटी परिसरातील नागरिकांकडून पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री. शत्रुघ्न बापू काटे , नगरसेविका मा.अनिताताई संदीप काटे , नगरसेविका मा.कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने कुंदन इस्टेट सोसायटीमध्ये प्रत्यक्ष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या तसेच पाणीपुरवठा नियमित, सुरळीत व योग्य दाबाने व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहे.

१३ फेब्रुवारी २०२६

8. रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी

झिंजूर्डे मळा येथे १८ मीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी 🗓️ १३ फेब्रुवारी २०२६ पिंपळे सौदागर परिसरातील झिंजूर्डे मळा येथे सुरू असलेल्या १८ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाची सविस्तर पाहणी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष मा.श्री. शत्रुघ्न बापू काटे , नगरसेविका मा.कुंदाताई संजय भिसे , नगरसेविका सौ. अनिताताई काटे आदींनी केली. कामाची प्रगती, वापरले जाणारे साहित्य, बांधकामाचा दर्जा, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी करण्यात येणारी ड्रेनेज व्यवस्था तसेच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. काम ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण व्हावे, यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सुलभता निर्माण होणार आहे. यावेळी श्री. जयनाथशेठ काटे, श्री. संदिपशेठ काटे, स्थापत्य उपअभियंता श्री. जोशी, कनिष्ठ अभियंता श्रीमती टकले तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

१० फेब्रुवारी २०२६

7. नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल

पिंपळे सौदागर येथील साईपल सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल पिंपळे सौदागर येथील साईपल सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळील चेंबरचे झाकण, पाईपलाईन व इतर राडारोडा टाकण्यात आल्या बद्दल नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ दखल घेण्यात आली. नगरसेविका डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे,भाजपा शहराध्यक्ष मा.श्री. शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका मा.अनिताताई संदीप काटे यांचे प्रतिनिधी म्हणून श्री.संजय भिसे व श्री. निलेश काटे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधला व उचित कार्यवाही करून घेतली. नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

०८ फेब्रुवारी २०२६

6. डस्टबिन व ईव्ही चार्जिंग उपक्रम

स्वच्छता आणि सुविधा यांचा संगम | ग्रीनलँड सोसायटीत सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ 🗓️ ०८ फेब्रुवारी २०२६ पिंपळे सौदागर येथील ग्रीनलँड सोसायटीमध्ये नगरसेविका डॉ. सौ₹ कुंदाताई संजय भिसे आणि संस्थापक श्री. संजय भिसे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी डस्टबिन तसेच ईव्ही चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष मा.श्री. शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, नगरसेविका मा.अनिताताई संदीप काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्वच्छ परिसर, पर्यावरणपूरक सवयी आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून, यामुळे सोसायटीतील दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. उन्नती सोशल फाउंडेशन यापूर्वीही विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांद्वारे समाजासाठी सातत्याने कार्य करत आहे. अशाच उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न पुढेही अखंड सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला. या वेळी ग्रीनलँड सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी तसेच रहिवासी बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०३ फेब्रुवारी २०२६

5. विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक

विकासकामांना गती देण्यासाठी ठाम भूमिका प्रभाग २८ मध्ये पालिका प्रशासनाला कडक सूचना 🗓️ ०३ फेब्रुवारी २०२६ प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर–रहाटणी) येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन आढावा बैठक व प्रत्यक्ष पाहणी दौरा संपन्न झाला. विकासकामांना वेग देण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. शत्रुघ्न बापूसाहेब काटे यांच्यासह नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांनी ठाम व आक्रमक भूमिका घेत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेवर भर दिला. या बैठकीदरम्यान काही कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कामांचा दर्जा, विलंबाची कारणे आणि अपूर्ण प्रकल्पांबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यात आला. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट व ठोस निर्देश देण्यात आले. रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट्स तसेच उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले. सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची व प्रगतीची तपासणी करण्यात आली. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच नागरिकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा ठाम संदेश या आढावा बैठकीतून देण्यात आला. या पाहणी दौऱ्यास भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. शत्रुघ्न बापूसाहेब काटे , नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, श्री. जयनाथशेठ काटे, श्री. संजयशेठ भिसे, श्री. संदिपशेठ काटे यांच्यासह संबंधित विभागांचे पालिका अधिकारी व विकासकामांचे कंत्राटदार उपस्थित होते.

०५ फेब्रुवारी २०२६

4. चौक सुशोभीकरण काम प्रगतीपथावर

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाच्या काम प्रगतीपथावर. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ.कुंदाताई भिसे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणांतर्गत चौक परिसरात विविध रंगीबेरंगी फुलांची झाडे,शोभेची झुडपे लावण्यात येत असून परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना स्वच्छ व आनंददायी वातावरण मिळणार आहे. या उपक्रमामुळे चौक परिसरात हिरवळ वाढणार असून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून महापालिका व लोकप्रतिनिधींच्या या पुढाकाराचे कौतुक व्यक्त केले जात आहे. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील चौक,रस्ते इ. सुशोभीकरण आणि निसर्गरम्य करण्याबाबत नगरसेवक श्री.शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ.कुंदाताई भिसे या तिन्ही नगरसेवकांनी विशेष प्राधान्य दिले आहे

०३ फेब्रुवारी २०२६

3. विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक

विकासकामांना गती देण्यासाठी ठाम भूमिका प्रभाग २८ मध्ये पालिका प्रशासनाला कडक सूचना 🗓️ ०३ फेब्रुवारी २०२६ प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर–रहाटणी) येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन आढावा बैठक व प्रत्यक्ष पाहणी दौरा संपन्न झाला. विकासकामांना वेग देण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. शत्रुघ्न बापूसाहेब काटे यांच्यासह नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांनी ठाम व आक्रमक भूमिका घेत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेवर भर दिला. या बैठकीदरम्यान काही कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कामांचा दर्जा, विलंबाची कारणे आणि अपूर्ण प्रकल्पांबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यात आला. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट व ठोस निर्देश देण्यात आले. रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट्स तसेच उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले. सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची व प्रगतीची तपासणी करण्यात आली. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच नागरिकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा ठाम संदेश या आढावा बैठकीतून देण्यात आला. या पाहणी दौऱ्यास भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. शत्रुघ्न बापूसाहेब काटे , नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, श्री. जयनाथशेठ काटे, श्री. संजयशेठ भिसे, श्री. संदिपशेठ काटे यांच्यासह संबंधित विभागांचे पालिका अधिकारी व विकासकामांचे कंत्राटदार उपस्थित होते.

२७ जानेवारी २०२६

2. अतिक्रमणमुक्तीसाठी ठोस कारवाई

पिंपळे सौदागर परिसरात अतिक्रमणमुक्तीसाठी ठोस कारवाई पिंपळे सौदागर येथील शिवार चौक, कोकणे चौक, गोविंद–यशदा चौक, कुनाल आयकॉन रोड तसेच लीनियर गार्डनलगतच्या फुटपाथवर वाढलेल्या बेकायदेशीर फेरीविक्रीमुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळे निर्माण होत होते. विशेषतः पादचाऱ्यांची सुरक्षितता, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह व सार्वजनिक शिस्त यावर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता ताई काटे , नगरसेविका कुंदाताई भिसे संबंधित विभागाच्या निदर्शनास हा गंभीर विषय आणून तातडीने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत कायदेशीर अतिक्रमणविरोधी कारवाई राबविण्यात आली. ही कारवाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, पादचाऱ्यांच्या हक्कांसाठी आणि परिसरातील सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण पुन्हा होऊ नये, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. स्वच्छ, सुरक्षित व शिस्तबद्ध पिंपळे सौदागर हेच आमचे ध्येय आहे.

२७ जानेवारी २०२६

1. चौकांचे सौंदर्यीकरण सुरू

पिंपळे सौदागर परिसरात चौकांचे सौंदर्यीकरण सुरू पिंपळे सौदागर परिसरातील विविध चौकांमध्ये सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता ताई काटे आणि नगरसेविका कुंदा ताई भिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत चौकांमध्ये रंगीबेरंगी फुलझाडे व शोभिवंत झुडपे लावण्यात येत असून, परिसर अधिक स्वच्छ, हिरवागार व देखणा करण्याचा उद्देश आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळून प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत महानगरपालिका व लोकप्रतिनिधींच्या कार्याचे कौतुक केले आहे.